सामान्य जनता आता उघडपणे भाजपच्या धोरणांविरोधात प्रश्न उपस्थित करू लागली आहे. ‘अच्छे दिन’च्या घोषणा आणि वास्तवातील परिस्थिती ह्यातील फरक लोकांना स्पष्ट दिसत आहे.
Credit: The Edge News
मुंबई-गोवा महामार्ग कोमात, टोलवसुली जोमात!
रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि पेणदरम्यान असलेल्या खारपाडा येथे टोलवसुली सुरू केली आहे.
आज युवासेना पुणे शहरातर्फे NEET Exams मध्ये झालेल्या घोटाळ्या संदर्भात आणि भ्रष्टाचार विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले पुणे शहरातील सर्व युवासेना पदाधिकारी आज उपस्थित होते.
ह्यावेळी शहरप्रमुख वसंत मोरे उपस्थित होते. NEET घोटाळ्याची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि पुण्यातील जे आरोपी त्यात सापडले त्यामध्ये प्रामुख्याने मनीषा ढमाले आणि त्या प्राचार्य असलेल्या मॉडर्न विद्यापीठाची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे ह्यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन केले.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू करणे, कांद्याला किमान २ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करणे, प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान देणे, कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवणे, खतावरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, कांदा चाळ उभारणीसाठी ७५ टक्के अनुदान देणे तसेच दर्जेदार कांदा बियाणे अनुदानित दरात उपलब्ध करून देणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.