इन्स्टाग्रामचं नवं अपडेट अर्थात ‘इन्स्टंट्स’ फिचर तुमच्या प्रायव्हसीसाठी डोकेदुखी ठरतंय? चुकून फोटो शेअर होण्याच्या तक्रारींमुळे तुम्हीही त्रस्त आहात? मग काळजी करू नका. जर तुम्हालाही हे फिचर नको असेल, तर ते बंद करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या...
#LokmatNews #Instagram #Insta #Instants #Tech
आपण ट्रेनने आजवर अनेकवेळा लांब लांबपर्यंत प्रवास केला आहे. पण कधी ऑक्सिजन मास्क लावायची वेळ आली नाही. बरोबर ना! पण 'या' ट्रेनने प्रवास करताना चक्क तुम्हाला ऑक्सिजन मास्क लावून बसावं लागतं. असं का, तुम्हालाही प्रश्न पडलाय ना? चला सांगतो...
#LokmatNews #MarathiNews #Train #Chaina
राजस्थानमधील कुलधारा गावातील भुतांच्या गोष्टी तर आपण ऐकूनच आहोत, पण महाराष्ट्रातही एक असं गाव आहे जिथे एक अनोखी परंपरा पाळण्यासाठी गावकरी चक्क 3 दिवसासाठी पूर्ण गाव सोडून जातात. कोणतं आहे हे गाव , चला सांगते..
#LokmatNews #Konkan #Horror #ViralStory #UnknownFactofIndia #ghosts
तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री विजय यांनी मंत्रिमंडळ विस्तार करत खातेवाटप जाहीर केले आहे. सी. जोसेफ विजय यांनी गृह, पोलीस आणि महिला व बाल कल्याण यांसारखी काही अत्यंत महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत, तर टीव्हीकेचे ज्येष्ठ नेते के. ए. सेंगोत्तैयन यांच्याकडे अर्थ मंत्रालय तसेच निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन भत्ते खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे.
आधव अर्जुन सार्वजनिक बांधकाम आणि क्रीडा विकास मंत्री झाले. इमारत बांधकाम, महामार्ग आणि लहान बंदरे यांसारख्या सार्वजनिक कामांची, तसेच क्रीडा विकासाची देखरेख करतील. डॉ. के. जी. अरुणराज यांच्याकडे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि कुटुंब कल्याण या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. पी. व्यंकटरमणन अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाले. सर्वांत तरुण मंत्री असलेल्या सेल्वी एस. कीर्तना यांच्याकडे उद्योग खाते देण्यात आले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी प्रोफाइलवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
CM Vijay allocated portfolios after winning the trust vote. He retained Home, Police, and Women & Child Welfare. Key ministries were assigned, including Finance to Sengottaiyan and Industries to the youngest minister, Keerthana.
#LokmatNews #MarathiNews #VijayThalapathy #Tamilnadu
सातारा जिल्ह्यातील मुनावळे गावचा ८ वर्षांच्या विराट भोसलेच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. त्याच्या नाकावर आणि घशावर विनामूल्य शस्त्रक्रिया करून शिंदे काकांनी त्याला मोठा दिलासा मिळवून दिला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या गावाजवळील मुनावळे गावात राहणाऱ्या विराटच्या नाकात आणि घशात जन्मतः एक गाठ होती. जस जसा तो मोठा होत गेला तशी या गाठी वाढत गेल्या. त्यामुळे रात्री झोपेत श्वास घेणे त्याला दिवसेंदिवस अवघड होत होते. सातारा येतील आठवले रुग्णालयात याबाबत तपासणी केली असता या आजारावर शस्त्रक्रिया करणे हाच उपाय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी प्रोफाइलवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Deputy CM Eknath Shinde aided 8-year-old Virat Bhosle with a free surgery for a throat condition. Unable to afford the surgery, Virat's family received immediate help from Shinde, who arranged the operation in Thane. The successful surgery brought relief to the family, showcasing Shinde's compassionate nature.
#LokmatNews #MarathiNews #EknathShinde #Satara
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यामध्ये दोन सुपरस्टार यांनी यशस्वी राजकीय वाटचाल करत मोठ्या पदांवर विराजमान झाले. एक म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि दुसरे म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय. पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशमध्ये राजकारणात प्रवेश करून मोठे यश मिळवले आणि उपमुख्यमंत्री झाले. यानंतर तामिळनाडूत विजय यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत सर्वाधिक जागा निवडून आणत मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. यानंतर आता या दोन्ही सुपरस्टारच्या चाहत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. यावर पवन कल्याण यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
थलपती विजय यांच्या तमिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. इतकेच नव्हे तर, या नवीन पक्षाने स्थापनेनंतर केवळ अडीच वर्षांतच सत्ता मिळवली आहे. तामिळनाडूच्या शेजारील राज्य आंध्र प्रदेशात सुपरस्टार पवन कल्याण यांनी एक राजकीय पक्ष स्थापन करून सक्रियपणे नेतृत्व केले. पवन कल्याण सध्या आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. परिणामी, आता विजय आणि पवन कल्याण यांची तुलना केली जात आहे. जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मुख्यमंत्री झालेल्या थलपती विजय यांच्याशी तुलना होणाऱ्या सोशल मीडियावरील कमेंट्सना प्रत्युत्तर दिले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी प्रोफाइलवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Pawan Kalyan addressed comparisons to Thalapathy Vijay, emphasizing their distinct political journeys. He highlighted Janasena's inclusive ideology and his commitment beyond holding office. Kalyan also mentioned health issues due to travel and dust, attributing his well-being to supporters' blessings.
#LokmatNews #MarathiNews #VijayThalapathy #PawanKalyan
मुदत संपलेल्या विटामिन पुरक खाद्यपदार्थांवरील एक्सपायरी डेट बदलून त्यांची बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा कल्याण गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २६ लाख ६३ हजार ५०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. लोकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी १४ मे २०२६ रोजी कल्याण पश्चिमेतील जुना मच्छीबाजार परिसरातील जुबेदा प्लाझामधील ‘हिना मिनी बाजार’ येथे छापा टाकला. या कारवाईत दुकान मालक अब्दुलकरीम रईस खान याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात मुदत संपलेले विटामिन सप्लिमेंट आणि खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. पोलिस तपासात अब्दुलकरीम खान हा भिवंडी येथील बिरबल रामदुलाहार यादव याच्याकडून हा माल खरेदी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी भिवंडीतील गोडाऊनवर छापा टाकत मोठा साठा जप्त केला. तपासात धक्कादायक बाब समोर आली. मुदत संपलेल्या उत्पादनांवरील मूळ एक्सपायरी डेटचे लेबल काढून त्यावर नवीन मुदतवाढीच्या तारखेचे बनावट लेबल लावले जात होते. यासंदर्भात कल्याण क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजित शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#LokmatNews #MarathiNews #MaharashtraNews
मीडियाच्या एका गटाने माझ्या तोंडी विधानाचा विपर्यास केला, याचा मला खेद आहे. विशेषतः अशा लोकांवर टीका केली होती, जे बनावट पदव्यांच्या आधारे वकिली व्यवसायात दाखल झाले आहेत. अशा व्यक्तींनी परजीवींप्रमाणे वावरत, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही शिरकाव केला आहे. देशातील तरुणांवर टीका केली, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. देशातील तरुणांचा मला अभिमान आहे. विकसित भारताची सर्वांत मोठी ताकद आहेत, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिले.
सविस्तर बातमी /national/supreme-court-cji-clarified-that-i-am-proud-of-the-youth-of-the-country-and-my-statement-was-distorted-a-a719/
CJI Suryakant clarified his statement, regretting misinterpretation by media regarding comments on fake degree holders infiltrating professions. He affirmed his pride in Indian youth, calling them the strength of developed India and dismissing claims of criticizing them. The court reprimanded a lawyer seeking senior advocate status.
#LokmatNews #MarathiNews #CJISuryakant #SupremeCourt
"मी कधीच जात, पात किंवा धर्म पाळून राजकारण केले नाही. माझ्याविषयी समाजामध्ये जाणीवपूर्वक गैरसमज आणि चुकीच्या भावना निर्माण करण्यात आल्या. मात्र, त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. माझा नियतीवर पूर्ण विश्वास असून, माझ्याविषयीचा गैरसमज नियतीच दूर करत आहे," असे प्रतिपादन राज्याचे माजी कृषिमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले.
परळी शहरात भव्य 'मराठा भवन' उभारण्यासाठी धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने २८ गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून नंदागौळ रस्त्यावरील वेताळ मंदिराजवळ या मराठा भवन नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या निर्णयाबद्दल मराठा युवा मंचच्या वतीने आमदार मुंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी प्रोफाइलवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Dhananjay Munde refutes allegations of biased politics after donating land for Maratha Bhavan in Parli. He aims to establish an educational project for Maratha students.
#LokmatNews #MarathiNews #DhananjayMunde #Politics #MaharastraNews
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना निमंत्रण मिळाले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय दौरे कमी करण्याचे केलेले आवाहन लक्षात घेऊन अमृता फडणवीस यांनी कान्स दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
#LokmatNews #MarathiNews #AmrutaFadnavis #NarendraModi
आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड हे केवळ खर्च करण्याचे साधन राहिले नसून, ते एक महत्त्वाचे आर्थिक नियोजन साधन बनले आहे. त्याचा हुशारीने वापर केल्यास तुम्ही वर्षाकाठी हजारो रुपयांची बचत करू शकता.
#LokmatMoney #CreditCard #Tips #Benefits #Savings