Legends of Legends….Era of Legends....
आपकी आशा....मेरी आशा....
अहो भाग्य माझं… "आशा"ताईंसोबत काम करण्याची संधी मिळाली,आणि त्या प्रत्येक क्षणाने माझ्या आयुष्यावर जणू सुवर्णाक्षरांनी आपली नोंद केली.आशाताईंसोबत काम करण्याची संधी मिळणं...हे नशिबातच असावं लागतं.
सात सुरांमध्येच संगीत बंदिस्त नसतं…
सात सुरांच्या पलीकडे “आशा” हा आठवा सुर आहे.
तो आवाज, ती उर्जा, आणि त्या क्षणांचा स्पर्श…
हे सगळं शब्दात न मावणारं.
ऐकत राहाव्या अशा 'आशाताई'
ऐकत राहू अशा "आशाताई"..
नतमस्तक आहोत "आशा" गायकी समोर.
....गणेश फुके
२२ नोव्हेंबर २०२४ याच दिवशी गतवर्षी चित्रपट विश्वातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजीमहाराज भाग १’ हा मराठी व हिंदी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आणि मराठी सिनेसृष्टीच्या श्रीमंतीची आणि भव्यतेची कक्षा आणखी रुंदावली.
हा चित्रपट बनवणं म्हणजे कुठलाही गड सर करण्यासारखंच अवघड होतं. पण हे आव्हान निर्माते सर्वश्री संदीपदादा मोहिते, शेखर मोहिते, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम, केतनराजे भोसले यांनी समर्थपणे पेललं. भारतीय चित्रपटसृष्टीत छत्रपती संभाजीमहाराज यांच्या जीवनावर प्रथमच इतक्या भव्य चित्रपटाची निर्मिती होत होती.
अनंत अडथळे आले कधी निसर्गाने वादळ, पावसाच्या रूपात परीक्षा घेतली, कधी लोकेशन्सच्या, कधी तांत्रिक अडचणी आल्या परंतु निर्मात्यांनी इमानी शिलेदारांप्रमाणे खिंड लढवली, त्यांना सगळ्या क्र्यू रूपी मावळ्यांनी साथ दिली.
छत्रपती शिवाजीमहाराजांनी तोरणा जिंकून जशी स्वराज्याला सुरुवात केली होती तशी छत्रपती संभाजी महाराजांच्या या पहिल्या भव्य चित्रकृतीने या मालिकेची यशस्वी सुरुवात झाली. याच मालिकेतील पुढचा भागही लवकरच येईल. छत्रपती शिवाजीमहाराजांनी जसं तोरण्यानंतर एक एक किल्ला सर करून स्वराज्य निर्माण केलं तसं छत्रपती संभाजीमहाराजांच्या या चित्रमालिकेतील पुढची चित्रकृती आणि उर्विता प्रॉडक्शन निर्मित अनेक भव्य, कलासंपन्न चित्रपट साकार होवून मराठी चित्रपटसृष्टीचं साम्राज्य समृद्ध होवो अशीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि संदीपदादांचं कणखर, लढाऊ नेतृत्व हा गड निश्चित सर करेल यात शंका नाही. सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. छत्रपती संभाजीमहाराज की जय !!
- गणेश फुके
We are delighted to announce that our film 'Tune of Life' has garnered the prestigious 'First Prize' at the 'DHWANI SPECIAL INTERNATIONAL FILM FESTIVAL' in Bhubaneswar, organized by 'The Government of Odisha and FICCI' among others. We extend our sincere appreciation and gratitude to everyone.Thanks to Team "Dhwani and Team "Tune of life"
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चित्रपट व सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र प्रदेश आयोजित, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री
मा. अजितदादा पवार
यांच्या वाढदिवसानिमित्त स्त्रिया संबंधित डॉक्युमेंटरी,शॉर्ट फिल्म्स, यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांक "मनगाव" दिग्दर्शक आकाश फुके, फुके फिल्म्स.
आयोजक •
श्री बाबासाहेब पाटील
प्रदेश अध्यक्ष
श्री नितीन धवने पाटील
प्रदेश उपाध्यक्ष
श्री आदित्य संजयराव
प्रदेश सरचिटणीस
श्रीमती अपेक्षा चव्हाण
प्रदेश चिटणीस
यांचे आभार..