माणूस हा त्याच्या कोऱ्या मनावरती कितीतरी गोष्टी रेखाटत असतो...
चेहऱ्यावरचे उद्गार, मनाचा संकोच, प्रश्नांच्या वाटेवर असताना उत्तरांचा आलेला अमान्य निरोप..हे सगळ रेखाटत असताना शेवटी आयुष्याला कधी न कधी लावला जाणारा पूर्णविराम या गोष्टीची त्याच्या मनात असलेली भीती तो त्याच्या कलेतून केव्हा न केव्हा रेखाटतचं असतो..
एक निरागस मनाचा कोपरा एवढ्या साऱ्या गोष्टींचा,किती सहजपणे सांभाळ करत असतो..नाही! नवलच वाटतं या सगळ्या कल्पने पलीकडच्या गोष्टींचं.नाही तरी स्वतः च्या सर्व चुका ,स्वतः चा चांगुलपणा ,स्वतः वर केलेले कित्तेक अन्याय ,हे सगळ तो साठवट जातो...याचा आपल्याला सुगावा ही लागत नाही कित्तेक वर्ष...,मग अचानक आयुष्यात घडलेल्या गोष्टींचा हिशेब करताना कळायला लागत की कितीतरी सहज घडून गेलेल्या गोष्टी कालांतराने चमत्कारिक वाटू लागतात..आणि ह्या सगळ्या प्रकारच्या प्रसंगातून आपण केव्हाचे अलगद निसटून गेलेलो असतो,,
ह्या कोऱ्या मनावर कितीही गोष्टी रेखाटल्या तरीही ते शेवटी कोरचं राहतं....,नवीन गोष्टींच्या अन् माणसाच्या मुखवट्या पलीकडच्या निरागस रूपाच्या शोधात....
✒️ Tejaswini Rathod 🌸
टाळते आहे तरी दारात येते सारखी
आठवण आता तुझी लाडात येते सारखी.!
भोवती असतोस तेंव्हा काय सांगू वादळा
एक वेडी वावटळ माझ्यात येते सारखी.!🌊
In frame- @martinet____
Pc - @fluctuating_72
डोकं जड पडलं आहे हल्ली लिहिता ही येत नाहीये,त्रास होणाऱ्या गोष्टींना.. अगोदर बर असायचं,मन अस्वस्थ वाटलं की लिहून मनाच्या वाटा मोकळ्या करता यायच्या ...आता ते ही जमत नाही.. तेवढ्या तीव्रतेने जाणवनाऱ्या गोष्टी तितक्याच ताकदीने व्यक्त करता येत नाही याचं च दुःख वाटत.. मनात खूप गोष्टी बोलून जाते..लिहिताना एक ही नीट लिहिता येत नाही..खूप अवघड होऊन जात हे सर्व.. डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या होत जातात,,अस मुसळधार पावसांसारख कोसळाव वाटतं..पण जमत नाही ,, डोक्यामध्ये सध्या काय सुरू आहे हे ही कळत नाहीये.. सगळ्या गोष्टींची गुंतागुंत झाली आहे..,, सगळ्या भावनांचा अस्त झाला आहे.. आजूबाजूचा आवाज ऐकू येत आहे ,निरर्थकता कळतं जातीय सगळ्या शब्दांची.. बाहेर गोंधळ , मनातली घालमेल ,हे सगळ ओसंडून वाहत गेलं पाहिजे ,वाहत्या पाण्यासारख..! सांत्वन करण्याच्या पलीकडे जातात काही गोष्टी¿.... जिथे सगळं व्यक्त करता येईल असा प्रवाह हवा असतो सर्वांना.. प्रत्येकालाच मिळतो अस नाही,,आणि ज्यांना कुणाला हा प्रवाह गवसला त्यांनी त्यात मिसळत जावं..वाहत जाव..!
✒️तेजस्विनी राठोड🌊🌿