“सुख कळले” या मालिकेसाठी सांस्कृतिक कलादर्पणचा सर्वोत्कृष्ट लेखक हा पुरस्कार जाहीर झाला आणि खरंच सुख कळले असं वाटायला लागलं. सुख कळले च्या दिवसांचा flash forward डोळ्यासमोरून तरळून गेला.. केदार ओमी आणि सुचित्रा ताई या तिघांनी हक्काने लिहायला सांगितलेली ही मालिका... कधी एकदा यात शिरलो मग घुसलो आणि मग सुखमय होऊन गेलो कळलंच नाही. त्यात आमची हुशार सोजल आम्हाला जॉईन झाली. भरपूर प्रश्न विचारून आम्हाला पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडणारी प्रज्ञा होतीच. सोहम, रोहन, अवनी, राहुल, दिनेश सर, सेटवरची सगळी मंडळी आणि अर्थात आम्हाला उशिरा जॉईन होऊन सुद्धा आमच्यात मिसळून गेलेल्या सुषमा ताई... सगळी भट्टी मस्त जमून आली.. सागर स्पृहा आरती स्वाती आशय अनिरुद्ध आणि सगळ्याच कलाकार मंडळीनी तुफान batting केली. हा पुरस्कार या सगळ्यांचा आहे... आम्हाला ही संधी दिल्या बद्धल कलर्स मराठी वाहिनी आणि हा पुरस्कार दिल्या बद्धल सांस्कृतिक कलादर्पणचे मनापासून आभार..
प्रत्येक वेळी टीम चांगली खेळली तरी आपण match जिंकतोच असं नाही- आमच्या या मालिकेने लवकर निरोप घेतला तरी लोकांना ती लक्षात राहिली. त्यातल्या पात्रांचं कौतुक झालं. संवादांबद्धल बोललं गेलं आणि आज.... हा प्रवास या पुरस्कारापाशी येऊन पोचलाय. मला या award चं अप्रूप यासाठी आहे कारण मी आणि गौरवने एकत्र लिहिलेली ही पहिली मालिका.. आमची creative डिस्कशन्स, contentला घेऊन घातलेले वाद, चांगलं काही सुचल्यावर उजळलेले चेहरे आणि रात्र रात्र जागून लिहिलेले प्लॉटस.. हे सगळं आजही बरकरार आहे आणि राहील पण त्या प्रवासाची ही सुखद सुरुवात पुढच्या रोलर कोस्टर राईड्स साठी बळ देईल...
Thanks Gaurav. Thank u Universe . Thank u Bappa. ❤️
.... सुख कळले...
🙏❤️🙏
On Public Demand... Presenting you Kaavyarth Version..
नात्याच्या हा अवघड खेळात
चल ये धरूया दोघे हात
नशिबाचे पुसुनी उन
आणू आता ही बरसात...
हवी ती वेळ जोडून घेई
तुझे नी माझे नेम....
लग्नानंतर होईलच प्रेम...
दोघांच्या या वेगळ्या भाषा
तरी जिंकलो संसार डाव
मिरवूया गळ्यात आता
तुझ्या माझ्या जगाचे नाव..
आपले येई आपल्यापाशी
माझा तुझ्यावर क्लेम....
लग्नानंतर होईलच प्रेम...
#kaavyarth
गीत : अश्विनी शेंडे
संगीत : अविनाश विश्वजीत
गायक : स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी
Thank you @star_pravah ❤️❤️
On public demand.... Presenting #jeevandini version.
हात सुटलेले गुंफले पुन्हा
मिळाले आता सुखाचे गाव
आवरू सावरू पसारा हा..
मांडू आता नवीन डाव
हात तुझाच येऊ दे हाती...
राहू दे सारे सेम...
लग्नानंतर होईलच प्रेम...
बात कालचीच वाटते जेव्हा
दोघे भेटलो घडले काय..
एका बशीतून अन कपातून
उतू गेली सुखाची साय...
आधी हरलो जिंकूया आता
पुन्हा खेळूया गेम..
लग्नानंतर होईलच प्रेम...
गीत : अश्विनी शेंडे
संगीत : अविनाश विश्वजीत
गायक : स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी
Thank you so much @star_pravah ♥️
प्रिय 2026,
तुझ्या मित्राचा, 2025 चा हात सोडायची वेळ जवळ आलेली.. तेव्हाच एक प्रॉमिस राखून ठेवलं होतं आपण एकमेकांसाठी.. की तू माझं एक मोठं स्वप्न पूर्ण करशील आणि त्या बदल्यात मी तुझे खूप सारे लाड पुरविन..
आपण एकमेकांना दिलेलं वचन पाळायला सुरुवात केली आहे 2026..
.... अक्षरा क्रिएशन्स तर्फे “ गाता रहे मेरा दिल... “ नावाचा एक नितांत सुंदर आणि देखणा कार्यक्रम नुकताच पार पडला. सुगंध उलगडून सांगता येत नाही तसंच रंगलेल्या कार्यक्रमाच्या आठवणी नुसत्याच दाखवता येतात, त्याची अनुभूती कॉपी पेस्ट करता येत नाही. तरीही काही सुंदर क्षणचित्रे आणि हलती चित्रे मुठीत पकडण्याचा केलेला हा एक भाबडा प्रयत्न..
Thank you everyone..